आजचे कापसाचे बाजार भाव, कापसाचे भाव वाढणार का? Kapus Bajar Bhav Today

Kapus Bajar Bhav Today राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अजून एक नवीन बातमीमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे भाव वाढणार आहेत का नाही याबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये कापसाला 8500 पर्यंत दर मिळत होता परंतु आता सध्या मार्केटमध्ये कापसाला फक्त सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी खूपच जास्त निराश झालेले आहेत शेतकऱ्यांना पुन्हा कापसाचे दर कधी वाढणार आहेत असे वाटत आहे परंतु शेतकरी मित्रांनो हा पुन्हा कापसाचा दर कधी वाढणार आहे याबाबत कापूस अभ्यासकांनी खूप सारी मते मांडली आहेत याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर चला मग जाणून घेऊया सगळं काही

कुसुम सोलर पंप योजना पेमेंट ऑप्शन आले, सर्वे कसा करायचा पहा, Kusum Solar Pump Yojana

Cotton Rate Today

शेतकरी मित्रांनो बऱ्याच कापूस अभ्यासाकांच्या मते कापसाचे दर हे येथे पंधरा दिवसांमध्ये वाढणार आहेत कापूस तज्ञांच्या मते कापसाचे भाव पुन्हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाढू शकतात कारण की सध्या बाजार समितीमध्ये कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि कापसाचे भाव हे प्रत्येक हप्त्यामध्ये 100 रुपयाने कमी होतात तर कधी शंभर रुपयाने वाढत आहे यामुळेच कापसाचे तरी पुन्हा वाढू शकतात असे कापूस तज्ञांची मते आहे आणि त्याबरोबरच जर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार केला तर सध्या अमेरिकेतील शेतकऱ्यांकडे सुद्धा कापूस उपलब्ध नाहीये आणि राहिली गोष्ट ब्राझील आणि चीन मधील कापसाची तर शेतकरी मित्रांनो येथे सुद्धा कापूस कमीच उपलब्ध आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सध्या फक्त पाच टक्के ते 10% कापू शिल्लक आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शंभर टक्के कापसाचे दर आठ हजार पाचशे रुपये पर्यंत वाढू शकतात असे कापूस तज्ञांचे मत आहे

Maharashtra Rain Alert विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात गारपीट होणार, पहा आजचा पावसाचा अंदाज

आजचे कापसाचे बाजार भाव

शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सरासरी 7300 रुपये प्रति क्विंटल ते 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे शासनाने कापसाला सात हजार वीस रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव दिला आहे तरीसुद्धा बऱ्याच बाजार समितीमध्ये कापसाला मागील महिन्यामध्ये 8500 पर्यंत कापसाला सर्वोच्च दर मिळत होता परंतु सध्या कापसाला पुन्हा भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त होत आहे शेतकऱ्यांना एकरी फक्त पाच क्विंटल पर्यंत कापसाचे उत्पन्न होते आणि कापसाला फक्त सात हजार भाव लागत असल्याने शेतकऱ्यांना फक्त 35 हजार रुपयांचे एकरभरात उत्पन्न होत आहे ज्यामध्ये त्यांचे बी बियाण्याचे खर्च शेतीच्या अवजारांचे खर्च खताचे खर्च आणि त्याबरोबरच मजुरांचा खर्च सुद्धा निघत नाहीये यामुळे शेतकरी दिवसेंदिवस हातास होत चाललेला आहे

दुष्काळ यादी 2023, 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान वाटप सुरू, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Dushkal Yadi 2023

1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, कापसाचे भाव वाढणार का? Kapus Bajar Bhav Today”

Leave a Comment