Maharashtra Rain Alert शेतकरी मित्रांनो या तीन ते चार दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सलग गारपीट आणि धो धो पाऊस होणार असल्याची माहिती हवामान अंदाज विभागाने वर्तवली आहे यामध्ये कोणते जिल्हे असतील आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील कोणत्या भागामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस होईल याची सर्व माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत याचबरोबर शेतकरी मित्रांनो यंदा स्कायमेट ने मान्सून मध्ये चांगला पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना दुष्काळापासून मुक्ती असे समजून घ्या. शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट अवकाळी पाऊस होणार आहे आणि त्याचबरोबर यंदाच्या मान्सून मध्ये कसा पाऊस राहील याची सुद्धा माहिती या लेखांमध्ये आपण घेणार आहोत तर चला मग सुरु करूया
दुष्काळ निधी 2023, 40 तालुक्यांना किती मिळणार अनुदान? पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Dushkal Nidhi 2023
आजचा पावसाचा अंदाज
शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने नोंदवली आहे त्याबरोबरच शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये जसे की विदर्भ कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये सुद्धा पाऊस सांगितला आहे तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट होणार आहे याबाबत थोडी माहिती घेऊया
शेतकरी मित्रांनो आज दिनांक 10 एप्रिल रोजी विदर्भामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट चा अंदाज वर्तवला आहे यामध्ये अकोला वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मेघगर्जनासह अवकाळी पाऊस होईल याची माहिती हवामान विभागाने दिली आहे त्यामुळे या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध राहा
आजचा हवामान अंदाज
त्याबरोबरच विदर्भामधील बुलढाणा अमरावती आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी येथे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे येथे सुद्धा गारपीट आणि अवकाळी पाऊस होऊ शकतो आणि त्याबरोबर 50 किलोमीटर ते 60 किलोमीटर वेगाने प्रति तास वारे वाहू शकते अशी सुद्धा अंदाज वर्तवले गेले आहेत
शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली, नांदेड बीड आणि त्याबरोबरच जळगाव येथे सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी येथील सुद्धा सावधानी बाळगावी नाहीतर नुकसानीचे खूप मोठे प्रमाण वाढू शकते याचप्रमाणे हवा आणि विभागाने बऱ्याच काही विभागांमध्ये रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट त्याबरोबरच येलो अलर्ट दर्शविले आहेत याप्रमाणे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकतो त्याबरोबरच गारपीट आणि कुठे कुठे वारी वादळ सुद्धा राहू शकते
2 thoughts on “Maharashtra Rain Alert विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात गारपीट होणार, पहा आजचा पावसाचा अंदाज”