Kusum Solar Pump Yojana कुसुम सोलर पंप योजनेत सहभाग नोंदवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ज्या शेतकऱ्यांनी 2021 2022 या वार्षिक काळामध्ये कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज नोंदवले होते अशा शेतकऱ्यांना सध्या पेमेंट आणि सेल्फ सर्वे ची ऑप्शन येत आहेत त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सेल्फ सर्वे करून पेमेंट करणे गरजेचे आहे पेमेंट केल्यानंतर ठीक पंधरा दिवसानंतर तुमच्या शेतामध्ये सोलार पंप चे इंस्टॉलेशन होते तर चला मग पाहूया कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत पेमेंट ऑप्शन कसे येते आणि त्याचबरोबर सध्या मार्केटमध्ये फेक पंप बसवण्याकरिता मेसेज येत आहेत आणि याच कारणामुळे अनेक शेतकरी डायव्हर्ट होऊन पेमेंट करीत आहेत आणि यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे तर आपण आज जाणून घेणार आहोत की खोटे मेसेज कसे ओळखायचे आणि जर तुम्हाला खरंच कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत मेसेज आले असतील तर पेमेंट आणि सेल्फ सर्वे कसे करायचे
कुसुम सोलर पंप योजना, शेतकऱ्यांची फसवणूक! खोटे SMS द्वारा होत आहे फसवणूक, Kusum solar Pump yojana
कुसुम सोलर पंप योजना पेमेंट ऑप्शन
शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी 2021 ते 2022 या वर्षांमध्ये आपले अर्ज नोंदवले होते अशा शेतकऱ्यांच्या मोबाईल वरती आता कुसुम सोलर अंतर्गत मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे आणि या मेसेजमध्ये त्यांना पेमेंटचे ऑप्शन आणि सेल्फ सर्वेचे ऑप्शन देण्यात येत आहेत त्याबरोबरच काही शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत खोटे मेसेज देखील आले आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना सर्वात आधी पेमेंट करून घेण्यासाठी सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर मग सेल्स सर्व्ह करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुद्धा होत आहे तर खोटे मेसेज कसे ओळखायचे याबाबत आपण थोडीशी माहिती घेऊया
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत पेमेंटच्या ऑप्शन आले असतील तर तुम्ही लवकरात लवकर महावितरणचे ॲप डाऊनलोड करायची आहे त्यानंतर महावितरण चे ॲप मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल त्या ओटीपी अंतर्गत तुमचे लॉगिन त्या महावितरण ॲप मध्ये होईल आणि त्यानंतरच मग तुम्हाला तुमचा फॉर्म दिसेल ज्यामध्ये जर तुम्हाला सेल्फ सर्व चे ऑप्शन आले असतील तर तुम्हाला तिथे दाखवण्यात येईल जिथे तुमचे नाव शेती तुम्ही फॉर्म कधी भरला आणि त्याबरोबरच सर्व काही माहिती तिथे येईल सेल्फ सर्वे केल्यानंतर लगेचच तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन देखील तिथे येऊन जाईल आणि जर तुम्हाला खोटे मेसेज आले असतील तर तुम्हाला महावितरण चे ॲप मध्ये सेल्फ सर्वे चे ऑप्शन कधीच दाखवणार नाही हे तुम्ही समजून घ्यायचा आहे
सेल्फ सर्वे कसा करायचा
शेतकरी मित्रांनो सेल्फ सर्वे करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महावितरण चे ॲप डाऊनलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकून ओटीपी टाकायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुसुम सोलर पंप च्या फॉर्ममध्ये जाऊन तिथे असेल तर ऑप्शन आली आहे काही पाहायचे आहे जर तुम्हाला सेल्फ सर्विस ऑप्शन आले असतील तर तुम्हाला ते क्लिक करून तुमच्या विहिरीचा विहिरीसोबत लाभार्थ्याचा आणि शेतीचा म्हणजे शेत जमिनीचा फोटो अपलोड करायचा आहे जिथे तुम्हाला अजून देखील प्रश्न विचारले जातील जसे की तुमचे महावितरण सोबत वीज कनेक्शन आहे का तर तुम्हाला तिथे नाही करायचा आहे त्याबरोबर तुम्हाला सिम कार्ड बद्दल विचारलं जाईल तुमच्या गावाचे सिम कार्ड चे कनेक्शन असतील ते तुम्ही तिथे टाकून द्यायचे आहे आणि मग तुम्ही सबमिट करून तुमचा सेल्फ सर्वे करून टाकायचा आहे
2 thoughts on “कुसुम सोलर पंप योजना पेमेंट ऑप्शन आले, सर्वे कसा करायचा पहा, Kusum Solar Pump Yojana”