Pik Vima 2023 शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि खुशखबरी मी आता घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी 75% पीक विमा मंजूर केलेला आहे जवळपास 24 जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपन्यांनी पिक विमा मंजूर केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरलेले आहे हा पिक विमा जवळपास 15 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित होण्यास सुरुवात होणार आहे अशी बातमी संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये 22 हजार 800 शेतकऱ्यांना होणार असल्याची आहे तर शेतकरी मित्रांनो याप्रमाणे जवळपास बऱ्याच तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये सुद्धा 75 टक्के पीक विमा वाटपास सुरुवात होणार आहे असे कळून येत आहे तर मग चला याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया
75% पिक विमा कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो 75 टक्के पिक विमा कधी मिळणार असे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते कारण की खरीप हंगामातील पिक विमा साठी बरेच शेतकरी प्रतीक्षेत आहेत कारण की यंदा काहीच उत्पन्न न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या हंगामामध्ये सुद्धा पेरणी करण्यासाठी आणि बी बियाणे खते विकत घेण्यासाठी सुद्धा पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे पिक विमा त्यामुळे शेतकरी 75 टक्के पीक विम्याची वाट पाहत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना 25 टक्के आगरीन पीक विमा सुद्धा नाही मिळाला या शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के पिक विमा म्हणजे सरसकट पिक विमा मिळणार असल्याचे कन्फर्म आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी थोडी वाट पहावी 15 एप्रिल नंतर किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या बँक खात्यावर 75 टक्के पिक विमा 100% जमा होईल याची आम्हाला खात्री आहे
पिक विमा 2023 साठी कोणते कोणते जिल्हे पात्र
पिक विम्यासाठी दुसरा ट्रिगर लावण्यात आलेला आहे यामध्ये जवळपास 24 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत अशा 24 जिल्ह्यासाठी हेक्टरी सरासरी आठ हजार पाचशे रुपये वितरित करण्यात येणार आहेत आणि त्याबरोबरच जर बोलायचं झाले तर हा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 15 एप्रिलच्या नंतर जमा होण्यास सुरुवात होणार आहे यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गावोगावी केवायसीच्या याद्या पाठवले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे इतर शेतकऱ्यांनी केवायसी करून नाही घेतली तर शेतकऱ्यांना पिक विमा भेटणे खूपच अवघड आहे शेतकरी मित्रांनो जर आपण पीक विमा साठी कोणते कोणते जिल्हे पात्र आहेत याबद्दल बोलले जावं तर तरी यामध्ये परभणी नांदेड हिंगोली, वाशिम बुलढाणा, अमरावती अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली जालना संभाजीनगर असे बरेच काही जिल्हे या पिक विमा साठी पात्र आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहावी पिक विमा त्यांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमा होईल
PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? लवकर पहा तारीख, PM Kisan Yojana 17th Installment