Chicken Biryani Recipe in marathi तर मित्रांनो तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला सर्वात जास्त चिकन बिर्याणी बद्दल प्रेम असेल. तर आपण बाहेर हॉटेलमध्ये चिकन बिर्याणी खाल्लीत असेल परंतु ही चिकन बिर्याणी आपल्याला घरी बनवायची असेल तर आपण काय काय करावे? कोणते सोपे उपाय आहेत ज्यांनी चिकन बिर्याणी घरामध्ये सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर बनेल? तर चला मग पाहूया या आर्टिकल मध्ये आपण सर्व काही माहिती घेऊया, चिकन बिर्याणी घरी फक्त 25 मिनिटांमध्ये कशी बनवायची.
चिकन बिर्याणीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू?
- एक किलो चिकन
- 5 हिरव्या इलायची
- एक मोठी इलायची
- दोन कप दही
- तीन कांदे
- चार टमाटे
- दोन हिरव्या मिरच्या कापून घ्या
- दोन चमचे लसूण पेस्ट
- दोन चमचे अद्रक पेस्ट
- तीन चमचे बिर्याणी मसाला
- केवडा जल
- खायचा लाल रंग
- कोथिंबीर
- एक चमचा पुदिना
- मीठ
- कढई
Chicken Biryani Recipe
- तर सर्वात प्रथम तुम्ही बासमती तांदूळ पाण्यामध्ये धुऊन घ्यावी आणि दहा मिनिटं भिजवून ठेवावे
- जोपर्यंत तांदूळ भिजत आहे तोपर्यंत चांगल्या पाण्याने चिकन धुऊन घ्यावे
- त्यानंतर कांदा आणि टमाट्याला कापून घ्यावे
- कोथिंबीर आणि पुदिनाला बारीक कापून घ्या
- एक मोठी कढई घ्या ज्यामध्ये तेल किंवा गावरान तूप घ्या दोन्ही पैकी एक
- मित्रांनो जेव्हा ती कढई गरम होईल आणि तेल थोडं थोडं गरम व्हायला लागेल तेव्हा त्यामध्ये कांदा विलायची मोठी इलायची टाकून घ्यावी जोपर्यंत कांदा गोल्डन कलरचा होत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये ही प्रोसेस करायची आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये चिकन पिसेस टाकायचे आहेत
- त्यानंतर चिकन चांगले तळल्यानंतर त्यामध्ये टमाटर अद्रक लसूण पेस्ट हिरवी मिरची दही, बिर्याणी मसाला आणि थोडं मीठ टाकायचं आहे आणि मस्तपैकी पाच मिनिटं कडेला हलवायचा आहे मोठ्या चमच्याने
- गॅस थोडा कमी करून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे मोठ्या चमच्याने चिकनला कढईमध्ये हलवायचा आहे जोपर्यंत चिकनची पीस नरम होत नाही
- हे सर्व काही झाल्यानंतर आपल्याला चिकनच्या कढईमध्ये दोन ते तीन लिटर पाणी टाकायचं आहे आणि वरून थोडासा मीठ टाकायचा आहे ज्यामुळे आपल्याला चव येईल
- आता आपल्याला सर्वात प्रथम तांदूळ शिकून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये जे काही आपण चिकनचे मटेरियल तयार केला आहे ते एकदम प्रॉपर चिकन सारखं करायचं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला तांदूळ शिजल्यानंतर तांदूळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एक आपल्याला मोठे पातेलं घ्यायचा आहे ज्यामध्ये तांदळाचे आणि चिकन मटेरियल चे दोन थर बसतील असे यानंतर आपल्याला या मोठ्या पातेल्यामध्ये एक थर शिजलेल्या भाताचा टाकायचा आहे त्यावरती चिकनचे पीसेस हा एक थर कम्प्लीट झाल्यास नंतर त्यावरती दुसरा थर शिकलेल्या भाताचा टाकायचा आहे त्यावरती शिरलेले चिकनचे मटेरियल टाकायचे आहे
- यानंतर आपल्याला खायचा कलर टाकायचा आहे ज्यामुळे बिर्याणीला वरच्या थरावरती रंग येईल तांदूळ आणि चिकन चांगले एकदम वरच्या थरावरती आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मग दहा ते पंधरा मिनिटं तसंच पातेल्याला वाकड जायचं आहे आणि मग तुमची 25 ते 30 मिनिटांमध्ये ही बिर्याणी एकदम रेडी होईल